16 May 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय
x

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला सुपडा साफ होण्याची भीती, 75 वर्षीय लालूंना पुन्हा तुरुंगात धाडण्याच्या हालचाली, CBI सुप्रीम कोर्टात

Lalu Prasad Yadav

Lalu Prasad Yadav | लोकसभा निवडणूक जवळ आल्या आहेत आणि बिहारमध्ये भाजपाला सुपडा साफ होण्याची भीती आहेत. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासोबत तरुण नेते तेजस्वी यादव या त्रिकुटासमोर भाजप तसेच मोदी-शहा यांचा निभाव लागणार नसल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे भाजप बिथरली आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे आता भाजप पुन्हा ED-CBI कारवाया जलद करणार असे संकेत मिळत होते. त्यासाठीच आता ७५ वर्षीय आणि गंभीर आजाराने झुंजणाऱ्या लालूप्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात धाडण्याचा हालचाली सुरु झाल्याचं दिसतंय.

चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या जामिनाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, जो मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात 25 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. लालू यादव यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत केंद्रीय तपास यंत्रणेने झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या बाजूने निकाल दिला तर येत्या काळात लालूंना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झारखंड उच्च न्यायालयाने राजद प्रमुखांना जामीन मंजूर केला होता. 30 एप्रिल 2022 रोजी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. चारा घोटाळ्याशी संबंधित दोरंडा कोषागार प्रकरणात ते सुमारे तीन वर्षे तुरुंगात होते. त्यानंतर सीबीआयने झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.

News Title : Lalu Prasad Yadav Vs CBI before Lok Sabha Election 18 August 2023.

हॅशटॅग्स

#Lalu Prasad Yadav(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x