17 May 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Tata Technologies IPO | पैसे तयात ठेवा, संधी चालून येतेय! टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअरची GMP पाहून परताव्याचा अंदाज घ्या, फायदा होईल

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणुकदार मागील काही महिन्यांपसून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता तुमची प्रतीक्षा संपली असं समजा. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO बाबत मोठी बातमी आली आहे. या कंपनीचा IPO ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात लाँच केला जाऊ शकतो. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. (Tata Technologies Share Price)

टाटा टेक्नॉलॉजी IPO प्राईस बँड :

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO साठी दाखल केलेल्या DRHP कागदपत्रांनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनी ऑफर फॉर सेल अंतर्गत 95,708,984 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचिबद्ध केले जाणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओचा आकार 12,000 कोटी रुपये असणार आहे.

IPO डिटेल सविस्तर :

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची किंमत बँड 295 रुपये असू शकते, अड अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे IPO शेअर्स 100 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. त्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्सची ग्रे मार्केट किंमत 105 रुपये किमतीवर पोहचली होती.

म्हणजेच शेअरची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत किंचित घसरली आहे. मोठ्या कंपनीच्या IPO स्टॉक GMP मध्ये किंचीत घसरण होणे, सामान्य बाब आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO today on 21 August 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x