7 May 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

ट्रम्प यांचा मोदी सरकारला दणका; भारताचा जिएसपी दर्जा हटवणार; निर्यातदार धास्तावले

Donald Trump, Narendra Modi

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतातील मोदी सरकारला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक विषयांना अनुसरून चिंतेत असलेली भारतीय अर्थव्यवस्था अजून खाली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. कारण अमेरिकेने भारतातील व्यापाराला प्रोत्साहन म्हणून दिलेला जीएसपी (जनरलाईज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स) दर्जा येत्या ५ जून पासून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, भारताने अमेरिकी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत सामान संधी देण्याचं कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे आम्हाला असा निर्णय घेणं भाग आहे. तत्पूर्वी मार्च महिन्यातच ट्रम्प यांनी टर्की आणि भारत या दोन्ही देशांचा जीएसपी दर्जा हटविण्याची शक्यता व्यक्त केली होते. कारण अमेरिकेच्या स्पष्टीकरणानुसार, भारतातील विविध प्रतिबंधांमुळे त्यांचे प्रचंड व्यावसायिक नुकसान होते आहे. त्यात भारताकडून अमेरिकी वस्तूंना समान दर्जा न दिल्याने आमच्या व्यापारावर अत्यंत गंभीर परिणाम होत आहेत असं व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

दरम्यान, देशातील प्रसार माध्यमांनी याबाबत भारतीय वाणिज्य सचिव अनुप वधावन यांनी विचारले असता, अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या अमेरिकेतील ५.६ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या