25 September 2020 12:28 AM
अँप डाउनलोड

शहांनी गृहमंत्री पदाचा पदभार घेताच, शहांची २०१०-१२ मधील तडीपारीची बातमी व्हायरल

Amit Shah, Narendra Modi

नवी दिल्ली : लोकसभेत मोदी सरकार पुन्हा बहुमताने विराजमान झाल्यावर शपथविधी सोहळा आटोपला आणि मंत्र्यांना देण्यात आलेल्या खात्याचा पदभार देखील स्वीकारला. मात्र यात सर्वात चर्चेला आलेला पदभार म्हणजे अमित शहा यांनी आज स्वीकारलेला गृहखात्याचा पदभार, त्यानंतर नेटिझन्सने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

निमित्त आहे २०१० मधील गुजरातमधील एका बहुचर्चित घटनेचं आणि त्याचाशी थेट संबंध आहे अमित शहा यांचा आणि त्यानिमित्त अनेक जुन्या बातम्या सध्या समाज माध्यमानवर व्हायरल होत आहेत. विषय असा आहे कि, सोहराबुद्दीन खटल्यासंबंधित तत्कालीन न्यायाधीश आफताब आलम यांच्याकडे सीबीआय’ने एक विनंती केली होती आणि त्यात अमित शहा यांना गुजरातमधून तडीपार केलं जावं असं म्हटलं होतं. कारण त्यामुळे या खटल्याच्या चौकशीत कोणतीही बाधा निर्माण होणार नाही. त्यानंतर २०१०-२०१२ या कालावधीत काही दिवसांसाठी अमित शहा यांना गुजरातमधून तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला होता.

त्यामुळे नेटिझन्सनी याच विषयाचा नेमका धागा पकडत, एकेकाळी गुजरातमध्ये आणि भाजपच्या सत्ता काळातच राज्यातून तडीपार करण्यात आलेले अमित शहा आज थेट देशाच्या गृहमंत्री पदी विराजमान झाल्याने समाज माध्यमांवर संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x