23 September 2021 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Vastu Tips | देव्हाऱ्याबाबत हे नियम पाळा | तरच घरात पैसा खेळता राहील | अन्यथा...

Vastu Shastra tips for a temple at home

मुंबई, ०४ सप्टेंबर | घर असावे घरासारखे, असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो वा खरेदी करत असतो. प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृहसजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे, कुठे असावे, याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे. घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

देव्हाऱ्याबाबत हे नियम पाळा, तरच घरात पैसा खेळता राहील, अन्यथा… – Vastu Shastra tips for a temple at home in Marathi :

घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच; परंतु देवघर आणि देव्हारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेकजण घेत असतात. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघरासाठी योग्य दिशा कोणती? जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी…

स्वयंपाकघरातील देवघर:
घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे, जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल.

ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते, असे सांगितले जाते. पूजा घरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. पूजा घरात पांढऱ्या, पिवळसर रंगाची संमगरवरी फरशी जरुर बसवावी.

देवघरातील मूर्ती:
देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात. कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंच धातूची असावी.

देव्हाऱ्यातील सर्व मूर्ती तोंडे पश्चिमेस असावी. म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल, अशा पद्धतीने मांडणी करावी. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे (शिवलिंगाचे) निमुळते टोक उत्तरेकडे करुन ठेवावे. पूजाघराला तोरण असावे, उंबरठा असावा.

देवघरात शिवलिंग ठेवावे का?:
देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे, असे सांगितले जाते. तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे.

अन्य देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे, असे सांगितले जाते.

देवघरात काय करू नये?
देवघरात महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पूजले जाऊ नयेत, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवघरात शनीची पूजा करू नये. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरात ठेवू नये, असे म्हटले जाते. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. गुरू व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये, असे सांगितले जाते. देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत. एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती व तसबीर (फोटो) असेल तर हरकत नाही.

‘हे’ही महत्त्वाचे:
देवघरात स्टोअरेज करताना तेल, वाती, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे. शिवाय हात पुसायला रुमाल लागतात. देवाचे वस्त्र असतात. ताम्हण, तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी. देवघरातील सजावटीचे सामानपण तिथेच राहील, याची काळजी घ्यावी. काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते. तिथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते.

अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे. योग्य त्या प्रकाशव्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते. योग्य प्रकाशव्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालते. देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहाण्याचा विचारही महत्त्वाचा आहे, असे सांगितले जाते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Vastu Shastra tips for a temple at home in Marathi.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x