
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स या बासमती आणि बिगर बासमती तांदळाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच सर्वेश्वर फूड्स कंपनी आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 2 मोफत बोनस शेअर्स वाटप करेल. याशिवाय सर्वेश्वर फूड्स कंपनी आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभजित करेल. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 130.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
जून 2023 तिमाही कामगिरी :
सर्वेश्वर फूड्स कंपनीने आपल्या शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 5 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत सर्वेश्वर फूड्स कंपनीने 2.91 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात 61 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2023 तिमाहीत सर्वेश्वर फूड्स कंपनीने 1.81 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत सर्वेश्वर फूड्स कंपनीने 2.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एप्रिल-जून 2023 या तिमाहीत सर्वेश्वर फूड्स कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 45 टक्के वाढीसह 187.68 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील 3 वर्षांत सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1367 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 एप्रिल 2020 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 8.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 130 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 159 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 26 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 49.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे आता 130 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.