
Tata Motors Share | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर 2023 या वर्षात तब्बल 53 टक्के मजबूत झाले आहेत. शुक्रवारी हा स्टॉक सकाळी 610.85 रुपये किमतीवर ओपन झाला, आणि अवघ्या काही तासात शेअरची किंमत 616.70 रुपये किमतीवर पोहचली होती. मात्र दिवसा अखेर टाटा मोटर्स स्टॉकमध्ये अचानक विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत 593.30 रुपयेवर आली होती. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के घसरणीसह 601.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
स्टॉक घसरणीचे कारण :
एक न्यूज एजन्सीने आपल्या विशेष अहवालात माहिती दिली की, भारत सरकार एक नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्याची तयारी करत आहे, जे टेस्ला कंपनीच्या प्रस्तावावर आधारित असून परकीय वाहन उत्पादकांसाठी आयात कर कमी करेल. या धोरणामुळे परकीय वाहन निर्मात्यां कंपन्यांना भारतात 15 टक्के कमी आयात कर आकारून पूर्णतः बाहेर देशात तयार केलेली ईव्ही गाडी भरतात आयात करता येईल. एका न्यूज एजन्सीने जाहीर केलेली ही माहिती भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
सविस्तर तपशील :
टेस्ला कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Y मॉडेल गाडीची किंमत अमेरिकेत टॅक्स क्रेडिट्सपूर्वी 47,740 डॉलर्स आहे. ही किंमत भारतीय चलनात जवळपास 40 लाख रुपये होते. भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार टेस्ला कंपनीचा प्रस्ताव मान्य झाला असून सरकार देखील स्वारस्य दाखवत आहे आणि भारत सरकार या धोरणाच्या प्रस्तावावर आणखी सखोल विचार करू इच्छित आहे.
कारण आयात केल्या जाणाऱ्या ईव्ही वाहनावरील कर कमी केले तर भारतीय EV वाहनांच्या व्यवसायावर आणि बाजारपेठेत व्यत्यय येऊ शकतो. याचा टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या दिग्गज भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांना नुकसान होऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.