20 May 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Indo US Bio Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 वर्षात इंडो यूएस बायोटेक शेअरने 523% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या

Indo US Bio Tech Share Price

Indo US Bio Tech Share Price | इंडो यूएस बायोटेक लिमिटेड कंपनीबाबत मोठी अपडेट आली आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. इंडो यूएस बायोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणत मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच कंपनीने एक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देण्याचे ठरवले होते.

इंडो यूएस बायोटेक कंपनीने यापूर्वी देखील गुंतवणूकदारांना दोन वेळा मोफत बोनस शेअर्स वाटलं केले होते. 24 ऑगस्ट 2023 रोजी इंडो यूएस बायोटेक कंपनीचे शेअर्स 550 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी इंडो यूएस बायोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.06 टक्के घसरणीसह 513.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रेकॉर्ड तारीख बदलली :

इंडो यूएस बायोटेक कंपनीने बोनस शेअर वाटप करण्याची पात्र निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 हा दिवस निश्चित केला होता. मात्र आता कंपनीने रेकॉर्ड तारीखमध्ये बदल केला आहे. आता बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 29 ऑगस्ट 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये इंडो यूएस बायोटेक कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 4 या प्रमाणत बोनस शेअर्स वाटप केले होते. आणि नोव्हेंबर 2021 मध्ये देखील कंपनीने 1 : 5 च्या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते.

गुंतवणुकीवर परतावा :

मागील 1 वर्षात इंडो यूएस बायोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 523 टक्के परतावा कमावून दिला आहे. इंडो यूएस बायो टेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 880 टक्के नफा कमावून दिला आहे. फक्त 2023 या वर्षात इंडो यूएस बायोटेक कंपनीच्या शेअरने लोकांना 267 टक्के पेक्षा जास्त कमाई करून दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indo US Bio Tech Share Price today on 26 August 2023.

हॅशटॅग्स

Indo US Bio Tech Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x