7 May 2025 3:05 PM
अँप डाउनलोड

इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडविली; लहान मुलांसहित १४ ठार

Syria, Russia

दमिश्क : इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आल्याने ४ मुलांसमवेत 14 जण ठार झाले आणि त्यामुळे सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात तब्बल २८ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून मोठ्याप्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. अजाज शहरातील एका मशिदीबाहेर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला.

अजाज शहर आजही तुर्की समर्थित सिरियाई विद्रोह्यांच्या ताब्यात आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. रविवारी इस्त्रायलकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यातही दहा जण ठार झाले होते. सिरियाने इस्त्रायलवर दोन रॉकेट डागले होते. यामुळे इस्त्रायलने प्रत्युत्तर दिले होते. या हल्ल्यात सिरियाचे ५ नागरिक आणि ५ सैनिक ठार झाले होते.

सिरियाने इस्त्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्समध्ये शनिवारी रात्री उशिरा दोन रॉकेट डागले होते. यापैकी एक इस्त्रायलच्या सीमेवर पडले होते. यावर इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, आमच्या सीमेवर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. आम्हीही या हल्ल्याचे जोरदार प्रत्यूत्तर देणार.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या