14 May 2025 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

Suzlon Share Price | तेजी थांबेना! सुझलॉन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांना श्रीमंत करणार? ब्रोकरेज फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स आता आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. मागील काही महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. (Suzlon Energy Share Price)

मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 25.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सुद्धा सुझलॉन एनर्जी शेअर 1.60 टक्के (NSE सकाळी ९:३०) तेजीसह 25.40 रुपयांवर ट्रेड करत आहे.

JM Financial फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 30 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर 25 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट रोजी देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट मध्ये ट्रेड करत होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 33,448.98 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने देशांतर्गत पावन ऊर्जा निर्मिती बाजारात 33 टक्के वाटा काबीज केला आहे. या कंपनीची जागतिक स्तरावर पावन ऊर्जा निर्मिती क्षमता 20GW आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, पुढील काळात नवीन ऊर्जा धोरणामुळे पवन ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी आता कर्जमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आर्थिक वर्ष 2023-26 मध्ये सुझलॉन कंपनीचा महसूल आणि EBITDA CAGR अनुक्रमे 31 टक्के आणि 38 टक्के पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सुझलॉन कंपनीचा EPS आर्थिक वर्ष 2026 मध्ये 1.4 रुपयेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 30 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 130 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 228 टक्के परतावा कमावून दिला आहे.

28 एप्रिल 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 8.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 24.65 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 4 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3 लाख रुपये झाले आहे.

सुझलॉन कंपनीला नुकताच टेक ग्रीन पॉवर इलेव्हन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 3 मेगावॅट क्षमतेची पवन टर्बाइन पुरवण्याची ऑर्डर प्राप्त झाली होती. टेक ग्रीन पॉवर ही कंपनी O2 पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची उपकंपनी म्हणून व्यवसाय करते. या नवीन ऑर्डर अंतर्गत सुझलॉन कंपनीला 64 विंड टर्बाइन जनरेटर पुरवायचे आहेत. प्रत्येक टर्बाइनची वीज निर्मिती क्षमता 3.15 मेगावॅट असेल.

या संपूर्ण पवन ऊर्जा प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 201.6 मेगावॅट असणार आहे. हा प्रकल्प 2025 मध्ये पूर्ण होईल. यासह सुझलॉन एनर्जी कंपनीला इंटाग्राम एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरकडून 31.5 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर देखील प्राप्त झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 04 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या