5 May 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

हे मुख्यमंत्री शिंदेंचं भूमिपुत्र प्रेम? | महाराष्ट्रातील बेरोजगारांना धक्का, महाविकास आघाडीच्या प्रयत्नांतून येणारी कंपनी गुजरातला पळवली

Semiconductor Plant

Semiconductor Plant | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातची निवड वेदांता लिमिटेडने सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी केली आहे. महाराष्ट्र राज्यही या प्रकल्पासाठी मोठा दावेदार आणि स्पर्धक होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची दखल न घेता आणि पडद्यामागून गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेत गुजरातने महाराष्ट्राकडून हा प्रकल्प राजकीय कुरघोडीतून अक्षरशः ओढून घेतल्याचं वृत्त आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी हे प्रकरण मार्गी लावण्यात आलं असा रिपोर्ट आहे. विशेष म्हणजे यासाठी आयएएस लॉबी सुद्धा कामाला लावण्यात आली हाती आणि राज्यातील मंत्रालयाला ‘ राजकीय स्टॅन्ड बाय’ मोडमध्ये ठेवण्यात आले होते असं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळू नये यासाठीच शिंदे-फडणवीस सरकार कामं करतंय का अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की, ”वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे जाहीर केले होते. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर मला धक्का बसला आहे.

20 अब्ज डॉलर्सच्या संयुक्त उपक्रमाची पहिली पायरी:
20 अब्ज डॉलर्सच्या संयुक्त उद्यमात पहिले पाऊल उचलत, वेदांता लिमिटेडने तैवानच्या फॉक्सकॉनसह, सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी पंतप्रधान मोदींच्या गृहराज्य गुजरातची निवड केली आहे, ज्यात अहमदाबादजवळील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले सुविधांचा समावेश असेल, असे सीएनबीसीने रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या ऑइल अँड मेटल ग्रुपला अर्धसंवाहक प्रकल्पांच्या उभारणीसाठी भांडवली खर्च आणि स्वस्त विजेसह आर्थिक व बिगर आर्थिक अनुदाने मिळाली. विशेष म्हणजे राज्यात भाजप पुरस्कृत सरकार आल्यावर गुजरातसाठी अनेक वेगाने हालचाली झाल्याचं वृत्त आहे.

या आठवड्यात औपचारिक स्वाक्षरीसह ही घोषणा अपेक्षित :
रिपोर्ट्सनुसार, वेदान्तच्या मेगा प्रोजेक्टच्या शर्यतीत महाराष्ट्र राज्य सुद्धा होतं. पण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात असताना राज्यात भाजप पुरस्कृत शिंदे सरकार आलं गुजरातने अलीकडच्या काही आठवड्यांत महाराष्ट्राकडून हा प्रकल्प अप्रत्यक्षरीत्या ओढून घेतल्याचं म्हटलं जातंय. या आठवड्यात दोन्ही बाजूंच्या सामंजस्य करारावर औपचारिक स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. ज्यात वेदांतचे अधिकारी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यात सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या प्रोत्साहनासाठी लॉबिंग करताना वेदांताने १००० एकर जमीन मोफत आणि वीज व पाणी सवलतीच्या व निश्चित भावात विशेषत: ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याची मागणी केली होती.

सेमीकंडक्टर बाजार 2026 पर्यंत 63 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता :
सन 2026 पर्यंत देशातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ 63 अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तैवानसारख्या काही देशांनीच जगातील चिप उत्पादनावर मर्यादा आणल्या असून भारताने उशिरा प्रवेश केला आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नवीन युग सुरू करण्यासाठी भारत आता कंपन्यांना सक्रियपणे दबाव आणत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Semiconductor Plant moved to Gujarat check details 13 September 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x