PM Modi in Madhya Pradesh | २०१४ मध्ये महागाई-बेरोजगारी संपवण्याचा संकल्प करून पीएम मोदी यांना मतदारांनी डोक्यावर घेतलं. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकांचे खिसे महागाईने वेगात खाली होतं आहेत. मात्र मागील १० वर्षात महागाई-बेरोजगारी मुद्द्यांवर चकार शब्द न काढणारे मोदी आता प्रचार सभांमध्ये धार्मिक मुद्दे उपस्थित करत आहेत, जेणेकरून मतदारांचं महागाई-बेरोजगारी मुद्द्यांवरून लक्ष विचलित करता येईल. वास्तविक अनेक भाजप नेत्यांनी सुद्धा हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, पण त्याची आठवण करून देतील तर ते मोदी कसले असंच म्हणावं लागेल.

दक्षिणेतील द्रमुक पक्षाच्या नेत्यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यांवर पंतप्रधान मोदींनी प्रचार सभेत प्रतिक्रिया दिली आहे. सनातनच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया अलायन्स’वर जोरदार हल्ला चढवला आणि मुंबईच्या बैठकीत ठराव घेऊन हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान म्हणाले की, विरोधकांना सनातन संपवायचे आहे आणि भारताला गुलामगिरीच्या युगात परत घेऊन जायचे आहे. मध्य प्रदेशातील बीना येथे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सची पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान मोदीयांनी एकीकडे जी-20 परिषदेच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख केला, तर दुसरीकडे ते विरोधकांवर हल्ला चढवताना दिसले.

‘इंडिया’ आघाडीला ‘इंडि अलायन्स’ आणि ‘घमंडीया आघाडी’ असे संबोधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांचा नेता आणि नेतृत्व निश्चित नाही, परंतु त्यांनी सनातनला विरोध करण्याचा निर्धार केला आहे. एकीकडे आजचा भारत जगाला जोडण्याची क्षमता दाखवत आहे. जागतिक स्तरावर आपला भारत एक जागतिक मित्र म्हणून उदयास येत आहे. तर दुसरीकडे काही पक्ष असे आहेत जे देश आणि समाजात फूट पाडण्यात गुंतले आहेत. दोघांनी मिळून ‘इंडी’ आघाडी केली.

याला काहीजण घमंडीया आघाडी असेही म्हणतात. त्यांचा नेता ठरलेला नाही, नेतृत्वाबाबत संभ्रम आहे, पण नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी ही आघाडी पुढे कशी चालेल, याचे धोरण व रणनीती आखली आहे, असे मला वाटते. त्यांनी आपला छुपा अजेंडा ठरवला. भारताच्या संस्कृतीवर हल्ला करण्याचे त्यांचे धोरण आहे. या आघाडीचा निर्णय आहे- भारतीयांच्या श्रद्धेवर आघात. हजारो वर्षांपासून भारताला जोडणारे विचार, मूल्ये, परंपरा नष्ट करण्याचा त्यांचा हेतू आहे.

News Title : PM Narendra Modi attacks India alliance over Sanatan-in Madhya Pradesh 14 September 2023.

मतदारांचं अभिनंदन! 2014 मध्ये महागाई-बेरोजगारी संपवण्याचा संकल्प करून PM झालेले मोदी म्हणाले, ‘सनातन संपवणं हाच इंडिया आघाडीचा संकल्प’