
RVNL Vs IRFC Share Price | रेल विकास निगम लिमिटेड ही सरकारी रेल्वे कंपनी मागील काही वर्षापासून सतत चर्चेत आहे. या कंपनीला एकामागून एक अनेक लहान मोठे ऑर्डर्स मिळाले आहेत. आणि त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. आता या कंपनीने 311.17 कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून एक नवीन ऑर्डर मिळवली आहे. (Multibagger Stocks)
मध्य रेल्वे विभागाकडून कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. आज गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी रेल विकास निगम स्टॉक 0.27 टक्के घसरणीसह 168.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 166.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 32.80 रुपये होती. नवीन ऑर्डरनुसार रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला 4 बोगदे, 2 पूल सोबत बॅलास्ट लेस ट्रॅक, 25 छोटे पूल, स्टोन गिट्टी, ट्रॅक लिंकिंग आणि साइड ड्रेन रिटेनिंग भिंती इत्यादी बांधण्याचे काम मिळाले आहे.
रेल विकास निगम कंपनीला मध्य रेल्वे विभागकडून देण्यात आलेली ऑर्डर 18 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. मागील एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे.
29 सप्टेंबर 2022 रोजी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 32.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 26 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 166.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 3 वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 763 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 यावर्षी या कंपनीचे शेअर्स 144 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
रेल विकास निगम कंपनीने 6-लेन महामार्ग बांधकामासाठी JV ची स्थापना केली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने नुकताच 6-लेन ग्रीनफिल्ड वाराणसी-रांची-कोलकाता महामार्गासाठी ट्रॅक्स आणि टॉवर्स इन्फ्राटेक कंपनीसोबत एक संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 1271 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.