15 December 2024 8:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

CRR ३ टक्क्यांवर; बाजारात ३ लाख ७४ हजार कोटी रूपये खेळते होणार

Covid 19, RBI Governor, Shashikant Das, Corona Crisis

मुंबई, २७ मार्च:  कोरोना विषाणूमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा फटका देशातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे. देशातील गरीब आणि कामगारवर्गासाठी केंद्र सरकारने गुरुवारी १ लाख ७० हजार कोटींची योजना जाहीर केली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही पत्रकार परिषद घेऊन रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करुन उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना विषाणूमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असून जीडीपीचे अपेक्षित उद्दिष्ठ गाठणे कठीण जाणार असल्याचे ते म्हणाले.

बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे. बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटल आहे.

करोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे. करोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेनं सीआरआर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांचा सीआरआर कमी करून तो ३ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे बाजारात ३ लाख ७४ हजार कोटी रूपये खेळते होतील, असही दास म्हणाले.

तीन महिने ईएमआय स्थगित करा
कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे. असं झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

News English Summary : The Reserve Bank of India today made a big announcement after the central government to protect the economy after a lock-down that was implemented across the country to curb taxation. The bank cut the key interest rate by 0.75 per cent to 4.40 per cent. The interest rate deduction has given a big boost to the consumers and the rate of home, auto and other loans will be reduced and the monthly installment burden will be reduced. To increase cash availability in the market, the SLR rate has been increased to 3 percent. This will provide additional cash of 1.7 lakh crore to the banks. Apart from this, two additional measures will provide additional cash of Rs 3.74 lakh crore by June 30, the RBI said. In the wake of the lock-down, the Bank’s Credit Committee had already convened a week-long meeting on the planned schedule. The committee decided to cut the repo rate by 0.75 per cent. The announcement was made by RBI Governor Shaktikant Das. RBI has reduced the repo rate by 0.75 percent to 4.40 percent. The reverse repo rate was reduced by 0.90 percent to 4 percent, Shakti said.

 

News English Title:  Story RBI governor Shaktikanta Das to address media on Covid 19 pandemic announcing steps to ease stress for businesses News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x