17 May 2024 11:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

ना महागाई, ना बेरोजगारी! विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांचा हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर भर, कोणती भीती दाखवली मुस्लिमांना?

Bihar Caste Based Census

Bihar Caste Based Census | बिहारमधील जातीय जनगणनेनंतर ओबीसी-ईबीसी हा सर्वात मोठा जातीसमूह आणि त्याचे निकाल यावरून चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात सर्वात मोठी लोकसंख्या गरिबांची आहे. काँग्रेसला आता मुस्लिमांचे अधिकार कमी करायचे असतील आणि ते अधिकार लोकसंख्येने ठरवले असतील तर हिंदूंनी पुढे येऊन मुस्लिमांचे सर्व हक्क घ्यावेत का, असा सवाल मोदींनी केला. त्यानंतर समाज माध्यमांवर मोदींच्या या विधानावरून जोरदार टीका सुरु झाली आहे.

बिहारमध्ये जातीय जनगणना जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभेत याचा थेट संबंध हिंदू-मुस्लिम मुद्द्याशी जोडला आहे. मात्र, त्यांनी बिहारचे नाव घेतले नाही, पण काँग्रेसचे नाव घेतं हे वक्तव्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील गेल्या काही दिवसांपासून जातीय जनगणनेची मागणी करत आहेत.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘कालपासून काँग्रेसने वेगळा राग काढायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, ज्या जातीच्या लोकांची जितकी लोकसंख्या आहे तितका त्यांना हक्क मिळाला पाहिजे. पण मी म्हणतो की या देशात जर सर्वात मोठी लोकसंख्या असेल तर ती गरिबांची आहे. त्यामुळे माझ्यासाठी गरीब ही सर्वात मोठी लोकसंख्या आहे आणि गरिबांचे कल्याण हेच माझे ब्रीदवाक्य आहे. विशेष म्हणजे देशात महागाईने गरिबांना अधिक सोसावं लागतंय याचाही मोदींना विसर पडल्याचं पाहायला मिळतंय.

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंचे काय?
काँग्रेसजनांनी लोकसंख्येनुसार हक्क मिळतील का, हे स्पष्ट करावे, मग काँग्रेसला अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? त्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी पुढे येऊन अल्पसंख्याकांचे सर्व हक्क घ्यावेत का? असं अजब प्रश्न त्यांनी प्रचारसभेत उपस्थित केला.

News Title : Bihar Caste Based Census in BJP Rally check details 03 October 2023.

हॅशटॅग्स

#Bihar Caste Based Census(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x