 
						Trident Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के वाढीसह 36.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 18870 कोटी रुपये आहे. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के नफा कमावून दिला आहे. 27 मार्च 2023 रोजी ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 25 रुपये नीचांकी पातळीपासून 40 टक्के वाढले आहेत.
ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 ऑक्टोबर 2018 रोजी 5.63 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 552 टक्के नफा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह 37.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
14 जुलै 1995 रोजी ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 75 पैशांवर ट्रेड करत होते. ट्रायडंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 4800 टक्के नफा कमावून दिला आहे. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांनी मध्य प्रदेश राज्यात बुधनी याठिकाणी नवीन रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प 9.5 क्षमतेचा आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प मध्यप्रदेश राज्यात बुधनी याठिकाणी कंपनीच्या उत्पादन केंद्राला वीज पुरवठा करणार आहे.
यामुळे कंपनीचे कार्बन फूटप्रिंट प्रमाण कमी होईल, असे मत कंपनीने व्यक्त केले आहे. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने मार्च 2024 पासून रासायनिक व्यवसायाच्या ऑपरेशनसाठी 100 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
ट्रायडेंट लिमिटेड ही कंपनी मुख्यतः कापड, कागद, सूत आणि रासायनिक उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी टॉवेल, प्रिंटिंग पेपर, विणकाम आणि होजियरी यार्न आणि सल्फ्यूरिक ऍसिड उत्पादन करण्याचा व्यवहार करते. ट्रायडेंट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18870 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 41.3 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
ट्रायडेंट लिमिटेड कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 73 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 370 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 550 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे 4000 टक्के वाढवले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		