
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते दिवाळीपर्यंत पेटीएम कंपनीचे शेअर्स 1500 रुपये किंमत करु शकतात. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना चढ-उतारांचा जबरदस्त अनुभव दिला होता. मात्र आता पेटीएम कंपनीचे शेअर मजबूत तेजीसह वाढत आहेत. तज्ञांच्या मते पेटीएम कंपनीचे शेअर्स 850 ते 900 रुपये किंमत पातळीवर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक वाटत आहेत.
दुसरीकडे या कंपनीचे व्यवस्थापन मंडळ भारतात अतिशय वेगाने डिजिटल व्यवहार वाढत असल्याचे संकेत देत आहे. सध्या डिजिटल व्यवहारात भारताने चीनला देखील मागे टाकले आहे. आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 1.72 टक्के वाढीसह 964.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
पेटीएम कंपनीचा क्यूआर बिझनेस झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पेटीएम कंपनी आपल्या अॅपद्वारे लहान मोठ्या दुकानदारांना 5000 रुपयेपर्यंतचे अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देत आहे, ही कंपनीच्या व्यवसायासाठी एक सकारात्मक बाब आहे. या सर्व कारणांमुळे, शेअर बाजारातील तज्ञांच्या मते पेटीएम कंपनीचे शेअर्स दिवाळीपर्यंत 1500 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
पेटीएम या फिनटेक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन ही आहे. 18 ऑक्टोबर रोजी या कंपनीचे शेअर्स 947 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पेटीएम स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 983.55 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 438.35 रुपये होती.
मागील सहा महिन्यात पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.40 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.