7 May 2024 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

पोटनिवडणुक: कडावल ग्रामपंचायत प्रभाग ३ मधून मनसेचे बाळकृष्ण ठाकुर विजयी

MNS, Raj Thackeray

मालवण : आज राज्यातील अनेक नगरपरिषदेतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. दरम्यान कडावल ग्रामपंचायत प्रभाग ३ मधून मनसेचे बाळकृष्ण ठाकुर विजयी झाले आहेत. सदर निवडणूक अत्यंत अटीतटीची झाल्याचं पाहायल मिळालं, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत केवळ ६ मतांच्या फरकाने मनसेचे उमेदवार बाळकृष्ण शंकर ठाकुर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय प्राप्त केला आहे.

विजयी होताच बाळकृष्ण ठाकुर यांनी मालवण येथे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. दरम्यान आज पुणे आणि चंद्रपूर येथील नगरपरिषदांचे देखील निकाल जाहीर झाले आहेत. पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भारतीय जनता पक्षाच्या ऐश्वर्या आशुतोष जाधव ह्या ३०९५ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ७१८० मते मिळाली. तर एनसीपीच्या रेणुका चलवादी यांना ४०८५ मत मिळाली आहेत. ऐश्वर्या आशुतोष जाधव यांनी गत महापालिका निवडणूक राष्ट्रवादीमधून लढली होती. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या आहेत.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी एकूण १७६ मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x