19 May 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

IREDA IPO | IREDA IPO लाँच, शेअरची किंमत 30 ते 32 रुपये, फक्त 13,800 रुपये गुंतवून सुरुवात करा

IREDA IPO

IREDA IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सरकारी मालकीची कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळनंतर आता सरकारी मालकीच्या कंपनीचा हा दुसरा मोठा IPO आहे.

सध्या या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या IPO चा आकार 2150 कोटी रुपये आहे. IREDA कंपनी आपल्या IPO मधे 1290 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स आणि 860 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत.

IREDA कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 460 शेअर्स ठेवले आहेत. गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 13,800 रुपये जमा करावे लागणार आहे. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या शेअरची किंमत बँड 30 रुपये ते 32 रुपये निश्चित केली आहे. या IPO चा एकुण आकार 2150.21 कोटी रुपये असेल. आणि त्यात 1290 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स इश्यू केले जाणार आहेत.

IREDA ही मिनीरत्न दर्जा प्राप्त असलेली सरकारी मालकीची कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः सौर, जल, बायोमास आणि जैवइंधन या क्षेत्रात वित्त पुरवठा करण्याचा काम करते. IREDA कंपनी एक ‘नॉन-बँकिंग वित्तीय संस्था’ असून ती अक्षय ऊर्जा प्रकल्प तसेच जाहिराती संबंधित व्यवसाय करते.

या कंपनीला 36 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. तज्ञांच्या मते दीर्घ मुदतीत या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. या सरकारी कंपनीच्या IPO स्टॉकची लिस्टिंग प्रीमियम किमतीवर होणे अपेक्षित आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA IPO for investment NSE 21 November 2023.

हॅशटॅग्स

IREDA IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x