20 May 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
x

CFF Fluid Share Price | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 130 टक्के परतावा देणारा शेअर, ऑर्डरबुक मजबूत होताच खरेदी वाढली

CFF Fluid Share Price

CFF Fluid Share Price | सीएफएफ फ्लुइड कंट्रोल या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनील गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीने 7.5 कोटी रुपये मुख्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमध्ये हीटिंग, वेंटिलेशन, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन सिस्टम सबंधित कामे देण्यात आले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीला एप्रिल 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

CFF फ्लुइड कंट्रोल कंपनीला भारतीय नौदलाकडून देखील 20.61 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. सीएफएफ फ्लुइड कंट्रोलमध्ये परकीय गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे अवघ्या 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून नावारूपाला आले आहे. सध्या हा शेअर 0.20% वाढीसह 426.80 रुपयांवर ट्रेड करत आहे.

सीएफएफ फ्लुइड कंट्रोल ही कंपनी मुख्यतः शिपपोर्ट मशिनरीच्या निर्मिती आणि सर्व्हिसिंग व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी कंपनी पाणबुडी आणि पृष्ठभागावरील जहाजांच्या चाचणी सुविधांमध्ये वापरल्या जाणार्‍या गंभीर घटक प्रणाली बनवण्याचे काम करते. सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनी भारतीय नौदलासाठी देखील मोठ्या प्रमाणात कामे करते.

सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीची स्थापना भारतीय नौदल, माझॅगॉन डॉक आणि जहाज बांधकाम व्यावसायिकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली होती. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवली आहे.

मागील 6 महिन्यांत शेअरने 130 टक्क्यांपेक्षा जास्त नफा दिला
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीने 60 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तरण्या तिमाहीत कंपनीचा कामकाजी नफा 17.76 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीने या तिमाहीत 58 टक्क्यांच्या वाढीसह 10 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. मागील 6 महिन्यांत सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीचे शेअर्स 425 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात या कंपनीचे शेअर्स 7 टक्के घसरले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जून 2023 रोजी CHF फ्लुइड कंट्रोल स्टॉक 166 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीच्या शेअरची किंमत 150 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | CFF Fluid Share Price NSE 24 November 2023.

हॅशटॅग्स

CFF Fluid Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x