15 May 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा
x

LIC Share Price | सुस्तावलेला एलआयसी शेअर अचानक तेजीत का? शेअर्समधील तेजी पुढे टिकून राहणार का?

LIC Share Price

LIC Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये LIC कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी एलआयसी कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 677.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एलआयसी स्टॉक शारे बाजारात सूचीबद्ध झाल्यापासुन ही सर्वात तेजी नोंदवली गेली आहे. एलआयसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,28,613.47 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी एलआयसी स्टॉक 0.36 टक्के वाढीसह 680.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 620.55 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवस भराच्या ट्रेडिंगमध्ये या कंपनीचे शेअर्स 682 रुपये या सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचले होते. मागील एका वर्षात एलआयसी कंपनीच्या शेअरने स्पर्श केलेली नीचांक पातळी किंमत 530.05 रुपये होती. तर उच्चांक पातळी किंमत 754.25 रुपये होती.

मागील 1 आठवड्यात एलआयसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3.38 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात एलआयसी कंपनीचे शेअर्स 8.55 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE 28 November 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(98)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x