18 May 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षात खुशखबर! महागाई भत्ता आणि HRA मध्ये होणार इतकी वाढ

7th Pay Commission

7th Pay Commission | देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजपने यश मिळवले आहे, तर तेलंगणात काँग्रेसने बहुमताने यश प्राप्त केले आहे. विद्यमान सरकारच्या राजकीय यशाने शेअर बाजार तर उत्साहित आहेच, शिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.

जानेवारी २०२४ पासून सुरू होणाऱ्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी ५ टक्के महागाई भत्ता म्हणजेच डीए मध्ये वाढ केली जाऊ शकते, असे मानले जात आहे. तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडेल. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एचआरए अर्थात घरभाडे भत्त्यात (एचआरए) वाढ होणार आहे.

5% वाढीची अपेक्षा का करावी?
ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार हा निर्देशांक १३८.४ अंकांवर आहे. महिनाभरापूर्वीच्या तुलनेत निर्देशांक ०.९ अंकांनी वधारला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीची प्रतीक्षा असली तरी आत्तापर्यंतचा पॅटर्न पाहता जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसू शकते, असा अंदाज आहे.

महागाई भत्त्याचा स्कोअर एआयसीपीआय निर्देशांकाद्वारे निश्चित केला जातो. महागाई किती आहे आणि त्या तुलनेत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता किती वाढवण्याची गरज आहे, याची क्षेत्रीय आकडेवारी या निर्देशांकात दाखवण्यात आली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होईल फायदा
2024 सालाच्या पूर्वार्धात अनेक अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने 5 टक्के भत्त्यात वाढ अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. खरं तर लोकसभा निवडणूकही पूर्वार्धात होणार आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये ही 5 टक्के वाढ करू शकते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे, तर पेन्शनधारकांची संख्याही ६४ लाखांच्या आसपास आहे. म्हणजेच ५ टक्के वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका एक कोटींहून अधिक लोकांना बसणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातूनही हा भक्कम आकडा आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : 7th Pay Commission Updates Check Details 07 December 2023.

हॅशटॅग्स

#7th Pay Commission(122)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x