Zomato Share Price | झोमॅटो शेअर्सच्या गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट! मागील 6 महिन्यांत 70% परतावा दिला, पण आता ही बातमी वाचा
Zomato Share Price | सध्या झोमॅटो कंपनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे. कारण जपानची सॉफ्टबँक झोमॅटो कंपनीचे शेअर्स विकणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार ब्लिंकिटच्या डील नंतर जो लॉक-इन कालावधी निश्चित केला होता, तो शुक्रवारी संपला आहे. आता सॉफ्टबँक आपले शेअर्स विकून प्रॉफिट बुक करु शकते, अशी बातमी शेअर बाजारात पसरली आहे. या बातमीनंतर झोमॅटो कंपनीच्या शेअर होल्डर्समध्ये कमालीची चिंता पाहायला मिळत आहे.
तब्बल 51 लाख शेअर्स एका ब्लॉकमध्ये विकले गेले
शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी झोमॅटो स्टॉक 93.35 रुपये किमतीवर ओपन झाला होता, मात्र विक्रीचा दबाव वाढल्याने शेअरची किंमत 90.45 रुपयेपर्यंत घसरली होती. शुक्रवारी झोमॅटो कंपनीचे तब्बल 51 लाख शेअर्स एका ब्लॉकमध्ये विकले गेले होते. त्यामुळे शेअरची किंमत 3 टक्के कमजोर झाली होती. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के घसरणीसह 92.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
झोमॅटो कंपनीने मागील वर्षी ब्लिंकिट कंपनीच्या सर्व शेअर धारकांना झोमॅटो कंपनीचे इक्विटी शेअर्स जारी केले होते. त्यानंतर झोमॅटो कंपनीने सहा महिन्यांच्या किमान लॉक-इन कालावधी ऐवजी गुंतवणुकदारांना 12 महिन्यांचा लॉक-इन कालावधी दिला. यातील बहुतांश शेअर्स सॉफ्टबँक, टायगर ग्लोबल, सेक्विया या तीन गुंतवणूक कंपन्यांनी घेतले होते. जेएम फायनान्शिअल फर्मच्या अहवालात असेल आढळले आहे की, झोमॅटो कंपनीचे प्री-आयपीओ स्टॉक धारक आणि प्री-ब्लिंकिट डील शेअर धारक सध्या मजबूत नफा कमाई करत आहेत.
मागील 6 महिन्यांत शेअरने 70 टक्के परतावा दिला
मागील 6 महिन्यांत झोमॅटो कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 70 टक्के मजबूत झाली आहे. 27 फेब्रुवारी 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 53.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर मार्च 2023 मध्ये झोमॅटो शेअरची किंमत 50 रुपयेपर्यंत कमजोर झाली होती. काही दिवसांपूर्वी झोमॅटो कंपनीच्या शेअरने 102.85 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 2023 या वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Zomato Share Price today on 26 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा