16 May 2024 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Integra Essentia Share Price | फुकट शेअर्स मिळवा! 10 रुपयांच्या शेअरवर फ्री शेअर्स मिळतील, अल्पावधीत 2500% परतावा

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | इंटेग्रा इसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा इसेंशिया कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 8.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे.

इंटेग्रा इसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा झाल्यानंतर पाहायला मिळाली आहे. इंटेग्रा इसेंशिया कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून 11 जानेवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी इंटेग्रा इसेंशिया कंपनीचे शेअर्स 19.77 टक्के वाढीसह 10.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंटेग्रा इसेंशिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने देखील इंटेग्रा इसेंशिया कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. इंटेग्रा इसेंशिया कंपनीचे शेअर्स 33 पैसे या आपल्या नीचांक किमतीवरून 2500 टक्के मजबूत झाले आहेत.

27 नोव्हेंबर 2020 रोजी इंटेग्रा इसेंशिया कंपनीचे शेअर्स 33 पैशांवर ट्रेड करत होते. तर 2 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.88 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 वर्षात इंटेग्रा इसेंशिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे.

3 जानेवारी 2022 रोजी इंटेग्रा इसेंशिया कंपनीचे शेअर्स 1.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 10 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील एका वर्षभरात इंटेग्रा इसेंशिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8.88 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.10 रुपये होती.

एलआयसी कंपनीने इंटेग्रा इसेंशिया कंपनीचे एकूण 48,59,916 शेअर्स होल्ड केले आहेत. म्हणजेच एलआयसी कंपनीने या कंपनीचे 1.06 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ही कंपनी प्रथमच आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स वाटप करत आहे. इंटेग्रा इसेंशिया ही कंपनी मुख्यतः कृषी उत्पादने, वस्त्र आणि, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा या क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी साहित्य, उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE 03 January 2024.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x