12 May 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Alok Industries Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! या कंपनीत रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक, खरेदीनंतर संयम नशीब बदलू शकते

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 25.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आलोक इंडस्ट्रीज ही मुकेश अंबानी यांची टेक्सटाईल कंपनी आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 10.07 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,840.11 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 1.63 टक्के घसरणीसह 27.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 63 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 3300 कोटी रुपये मूल्याचे नॉन-कन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स खरेदी केले होते.

RIL कंपनीला आलोक इंडस्ट्रीज कंपनीने 9 टक्के लाभांश दराने प्रायव्हेट प्लेसमेंटच्या आधारावर प्रेफरंस शेअर्स जारी केले होते. 2020 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने जेएम फायनान्शियल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या सहकार्याने दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर वस्त्रोद्योग क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपली स्थिती आणखी मजबूत केली.

सप्टेंबर 2023 तिमाहीच्या अखेरीस रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर जेएम फायनान्शियल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले होते. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी पुढील काळात वस्त्रोद्योग क्षेत्रात आणखी व्यवसाय विस्तार करेल याचे संकेत मिळत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE Live 04 January 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x