
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असणाऱ्या अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी होत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 1229.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील अदानी पोर्ट्स स्टॉक मजबूत वाढीसह क्लोज झाला आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी अदानी पोर्ट स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1184.05 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र काही तासात हा स्टॉक 5.23 टक्क्यांच्या वाढीसह 1229.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 1.51 टक्के वाढीसह 1,215.20 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 394.95 रुपये होती. तर मागील एका महिन्यात अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 18 टक्क्यांनी वाढली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बाँड मार्केट मानले जात आहे.
अदानी पोर्ट्स कंपनीने मागील 2 वर्षांत पहिल्यांदा रोखे जारी केले. आणि कंपनीच्या रोख्यांना गुंतवणुकदारांनी मजबूत प्रतिसाद दिला आहे. अदानी पोर्ट्स कंपनीने 500 कोटी रुपये मूल्याच्या 2 सूचीबद्ध बाँडसाठी बोली मागवल्या होत्या. एक बाँड 5 वर्षात आणि दुसरा बाँड 10 वर्षात परिपक्व होईल. त्यांचे व्याजदर अनुक्रमे 7.80 टक्के आणि 7.90 टक्के निश्चित करण्यात आले आहे.
अदानी पोर्ट्स कंपनीने बाँड जारी करून निधी उभारल्याची बातमी अशा वेळी आली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने अदानी समुहाला मोठा दिलासा दिला आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी अदानी पोर्ट्स स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते, 2030 पर्यंत अदानी पोर्ट्स ही भारतीय कंपनी जगातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेट करणारी खाजगी कंपनी म्हणून ओळखली जाईल. डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी पोर्ट्स कंपनीच्या व्हॉल्यूम वाढीत वार्षिक आधारावर 42 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.