9 May 2024 3:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स खरेदी करावा की विकून टाकावा? अस्थिरता वाढली, आता महत्वाची अपडेट आली

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित घसरणीसह ट्रेड करत होते. शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील स्टॉक 132.60 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यापूर्वीच्या म्हणजेच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 134.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 133.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

टाटा स्टील कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, टाटा स्टील कंपनी वेल्समधील पोर्ट टॅलबोट स्टील वर्क्स कंपनीमधील दोन ब्लास्ट फर्नेस बंद करणार आहे. यामुळे टाटा स्टील कंपनीच्या वेल्समधील प्लांटमधील 2,800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. स्टील व्यवसायात पारंपारिक ब्लास्ट फर्नेसपेक्षा अधिक टिकाऊ असलेल्या ग्रीन फर्नेसचा वापर करण्याची योजना टाटा स्टील कंपनीने आखली आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 134 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स फक्त 9 टक्के वाढले आहेत. याच काळात निफ्टी-50 इंडेक्समध्ये 20 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. पोर्ट टॅलबोटमधील दोन हाय उत्सर्जन ब्लास्ट फर्नेस आणि कोक ओव्हन टप्प्याटप्प्याने बंद करण्याची योजना टाटा स्टील कंपनीने आखली आहे. टाटा स्टील कंपनी पहिली ब्लास्ट फर्नेस 2024 च्या मध्यात आणि उर्वरित भट्टी 2024 च्या उत्तरार्धात बंद करणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत टाटा स्टील कंपनीने माहिती दिली आहे की, या निर्णयामुळे पुढील 18 महिन्यांत 2,500 कामगारांच्या नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्रिटीश मीडिया रिपोर्टनुसार, काही स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या स्टील स्लॅबसाठी खुल्या ठेवल्या तर 200 कामगारांच्या नोकऱ्या वाचण्याची शक्यता आहे. टाटा स्टील कंपनीच्या सीईओने माहिती दिली की, प्रस्तावित पुनर्रचनेचा परिणाम खूप मोठ्या समुदायांवर होणार आहे. यासाठी टाटा स्टील कंपनी कामगारांना सर्वसमावेशक सहाय्य पॅकेज देण्यासाठी वचनबद्ध आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 22 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x