 
						Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 17.5 टक्क्यांच्या वाढीसह 21.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड स्टॉकमधील कालच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने 2 फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आणि या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 19.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेबीला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कल्लोल सेन यांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी पूर्णवेळ कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव विचारात घेतला जाण्याची शक्यता आहे. सेन सध्या Moats & Bots Technologies कंपनीच्या संस्थापक आणि CEO पदावर जबाबदारी पार पाडत आहेत.
मागील पाच दिवसांत ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्के वाढली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्समध्ये 7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील सहा महिन्यांत ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 23 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्के कमजोर झाली होती. मागील 5 वर्षात ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,302.78 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 5 वर्षात ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.44 रुपये किमतीवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांक किमतीच्या तुलनेत ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 83 टक्क्यांनी घसरले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 36.82 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.27 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,098.40 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		