Aurionpro Solutions Share Price | फक्त 3 वर्षात ओरियनप्रो सोल्युशन्स शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 17.94 लाख रुपये परतावा
Aurionpro Solutions Share Price | ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या IT सेवा देणाऱ्या कंपनीने माहिती दिली की, 2005 ते 2023 या काळात कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 26 टक्के CAGR दराने परतावा दिला आहे.
14 जून रोजी कंपनीने माहिती दिली की, 2005 मध्ये कंपनीने 100 दशलक्ष रुपये महसूल वरून 2023 मध्ये 6,590 दशलक्ष रुपये पर्यंत महसूल वाढ नोंदवली आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 1,008.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मलबार इंडिया फंडाने 14 जून 2023 रोजी बल्क डीलद्वारे ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे 2.63 लाख शेअर्स किंवा म्हणजेच 1.15 टक्के भाग भांडवल सरासरी 880.23 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले आहेत. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार Indus Valley Holdings Pte Ltd कंपनीने देखील ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे 2 लाख शेअर्स सरासरी 881.38 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले आहेत.
ऑरियनप्रो सोल्युशन्सच्या शेअरची किंमत मागील तीन वर्षांत 1,439 टक्के वाढली आहे. 12 जून 2020 रोजी ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 56 रुपये किमतवर क्लोज झाले होते. तर 15 जून 2023 रोजी हा स्टॉक 1005.15 रुपयेवर पोहोचला होता.
गुंतवणूकीवर परतावा
तीन वर्षापूर्वी ज्या लोकांनी ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 17.94 लाख झाले आहे. ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स आज 998 रुपये किमतीवर ओपन झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2392.27 कोटी रुपये आहे. आजची शेअरची उच्चांक पातळी किंमत 1040 रुपये होती. आता स्टॉक 1008 रुपये जवळ ट्रेड करत आहे.
शेअरची कामगिरी
ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 269.21 टक्के वाढले आहेत. तर 2023 मध्ये हा स्टॉक 193 टक्के मजबूत झाला आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या सात प्रवर्तकांनी कंपनीचे 33 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आणि 13,099 सार्वजनिक शरे धारकांनी कंपनीचे 67 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
यापैकी 12,234 सार्वजनिक स्टॉक धारकांकडे 37.24 लाख शेअर्स म्हणजेच 16.34 टक्के भाग भांडवल आहे, ज्याचे मूल्य 2 लाख किंवा त्या पेक्षा कमी आहे. 17.14 टक्के भाग भांडवल असलेल्या केवळ 54 शेअर धारकांनी मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Aurionpro Solutions Share Price today on 16 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या