12 May 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या किंमतीने धाकधूक वाढली, आता खरेदी करणेच फायद्याचे, नवे दर पटापट तपासून घ्या

Highlights:

  • Gold Price Today
  • सोनं-चांदी खूप महाग होणार?
  • आज सराफा बाजारात सोनं किती महागलं
  • एमसीएक्स सुद्धा सोन्याचा भाव वाढला
Gold Price Today

Gold Price Today | विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतारांचा काळ सुरू आहे. गेल्या महिन्यात 5 मे रोजी सोने आणि चांदीने विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोनं 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाली होती.

त्यानंतर एक दिवसापूर्वी सोने 59,000 रुपयांच्या जवळ आणि चांदी 71,000 रुपयांच्या जवळ आली होती. पण घसरणीच्या दुसऱ्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी दिसून येत आहे.

सोनं-चांदी खूप महाग होणार?

एक दिवस आधी सोनं 2700 रुपये आणि चांदी 6000 रुपयांनी घसरलं होतं. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी त्यात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजसह (एमसीएक्स) सराफा बाजारातही ही तेजी दिसून येत आहे. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये सुरू असलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी दर आणखी वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवाळीनिमित्त सोनं 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते.

आज सराफा बाजारात सोनं किती महागलं

सराफा बाजार https://ibjarates.com अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या दरातही शुक्रवारी वाढ दिसून आली. आज शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव मुंबई-पुणेसह देशातील प्रमुख सराफा बाजारात 500 रुपयांनी वाढून 59492 रुपयांवर पोहोचला आहे.तसेच चांदीचा दर 1000 रुपयांनी वाढून 72284 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे. याआधी गुरुवारी सोने 58934 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 71062 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.

एमसीएक्स सुद्धा सोन्याचा भाव वाढला

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोने 50 रुपयांनी वधारून 59405 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 273 रुपयांनी वाढून 72399 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. याआधी गुरुवारी एमसीएक्सवर सोने 59355 रुपये आणि चांदी 72126 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates check details on 16 June 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x