3 May 2024 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

आमदार खरेदी-विक्री लवकरच मध्य प्रदेशात देखील होणार? लोकशाही विकत घेतली जाते आहे?

Karnataka, Goa, Madhya Pradesh, BJP, Amit Shah

भोपाळ : मतदाराने एखाद्या अमुक पक्षाला मतदान केले आणि निवडून आलेल्या आमदाराने स्वतःच विकून एकप्रकारे मतदाराच्या मताला विकून स्वतःच्या खिशात बक्कळ पैसा कोंबणे असाच होतो. एकीकडे भाजपने पैशाच्या बळावर लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा सपाटाच लावला असून काँग्रेस देखील हतबल असल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ कर्नाटक राज्यात दाखल होताच, मध्य प्रदेशात आर्थिक बळावर हालचाली सुरु झाल्याचं म्हंटल जात आहे.

कारण कर्नाटक आणि गोव्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर मध्य प्रदेश सरकार आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून तसे थेट संकेत देऊन राजकीय वातावरण गढूळ करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं वृत्त आहे. दरम्यान काँग्रेसकडून देखील विरोधी पक्ष केवळ स्वप्न बघत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु खबरदारी म्हणून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका मंत्र्याला ४ आमदारांना सांभळण्याची जबाबदारी दिल्याचे वृत्त आहे.

सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय जाणता पक्षाचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गोवा आणि कर्नाटकमधून उठलेलं वादळ मध्य प्रदेशच्या दिशेने वाहत असून काही दिवसांत वातावरण ठिक होईल असा व्हॉट्सअप मॅसेज आल्याचं सांगत संकेत दिले आहेत. तर मध्य प्रदेशमधील अन्न पुरवठा मंत्री प्रद्युम सिंह तोमर यांनी सरकारवर कोणतंही संकट नसल्याचा दावा केला आहे. आमच्या सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांनी सांगितले आहे. तर भारतीय जनता पक्ष मागील ७ महिन्यांपासून स्वप्न बघत आहे असा टोला मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला आहे. २०१८ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १०९ जागा तर काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. तर भारतीय जनता पक्षातील एका आमदाराला खासदारकीची संधी मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची एकूण संख्या १०८ वर आली आहे. सरकार स्थापनेसाठी ११६ आमदारांची गरज आहे.

दरम्यान काँग्रेस सरकारला १ समाजवादी पक्ष, २ बहुजन समाज पक्ष आणि ४ अपक्ष आमदारांचा जाहीर पाठिंबा आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून नेत्यांकडून सत्ता स्थापनेची स्वप्न पाहिली जात आहे असा दावा काँग्रेसने केला. तर ज्या बहुजन समाज पक्षातील आमदाराने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तो आमदार सध्या नाराज आहे असं देखील म्हटलं जात आहे. शुक्रवारी विधानसभेत बहुजन समाज पक्षाचे आमदार रामबाई यांनी त्यांच्या कुटुंबाला एक प्रकरणात गोवलं जात आहे असा आरोप केला. तसेच जर त्यांना न्याय मिळत नसेल तर राज्यात कोणाला न्याय मिळणार अशी नाराजी बसपा आमदाराने बोलून दाखविली त्यामुळे भाजपा नेते आनंदी आहेत. त्यामुळे आगामी काळात गोवा, कर्नाटकसारखं मध्य प्रदेशातही राजकीय संकट उभं राहील का यावर प्रश्नचिन्ह आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x