16 May 2024 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

KPI Green Energy Share Price | कुबेर कृपा असलेला शेअर तुफान तेजीत, 3 वर्षात 7300% परतावा दिला, बक्कळ कमाई होईल

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी या गुजरात स्थित कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 1479.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या उपकंपनीला 1.5 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बांधण्याची ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1618.71 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 259.16 रुपये होती. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1,475.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

हा प्रकल्प 2024-25 या आर्थिक वर्षात पूर्ण केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या उपकंपनीला एथर इंडस्ट्रीज कंपनीकडून 15 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली होती. तर जानेवारी 2021 मध्ये, केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या उपकंपनीला स्कायविन पेपर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 5 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणीची ऑर्डर दिली होती. त्यानंतर श्री वरूडी पेपर मिल कंपनीने देखील 5.60 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणीची ऑर्डर दिली होती.

मागील काही वर्षांत KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 12 फेब्रुवारी 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 फेब्रुवारी 2024 रोजी हा स्टॉक 1479.15 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 3 वर्षांत KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7300 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 रुपयेवरून वाढून 1479.15 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 389 टक्के नफा कमावून दिला आहे.

दरम्यान केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दोन वेळा मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले आहे. जानेवारी 2023 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 17 February 2024.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x