9 May 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

HG Infra Share Price | एचजी इन्फ्रा कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू, फायदा घेणार?

HG Infra Share Price

HG Infra Share Price | एचजी इन्फ्रा या कन्स्ट्रक्शन कंपनीला नुकताच एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. EPC मोड अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधकाम प्रकल्पासंबंधित काम करण्यासाठी एचजी इन्फ्रा कंपनीला सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित केले आहे. NHAI च्या प्रकल्पाचे एकूण मुल्य 690.05 कोटी रुपये आहे. हे प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी एचजी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 918.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( एचजी इन्फ्रा कंपनी अंश )

या प्रकल्पाअंतर्गत एचजी इन्फ्रा कंपनीला NH-33 च्या जमशेदपूर विभागावरील कालीमंदिर, दिमना चौक, बालीगुमाचा 4 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरचे 10.021 किमी लांबीचे बांधकाम पूर्ण करायचे आहे. एचजी इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी आणि बांधकाम, रस्ते, पूल, उड्डाणपूल आणि इतर पायाभूत प्रकल्पांचे बांधकाम आणि देखभाल करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. नुकताच एचजी इन्फ्रा कंपनीला भारतीय रेल्वेकडून देखील मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने या कंपनीला 447.11 कोटी रुपये मूल्याचे काम दिले आहे. या प्रकल्पाचे काम पुढील 30 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

7 मार्च 2027 रोजी एचजी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के वाढीसह 908.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एचजी इन्फ्रा कंपनीमध्ये 74.53 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 25.47 टक्के भाग भांडवल केले धारण आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 33.40 अंकांच्या वाढीसह 74,119.39 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक देखील 19.50 अंकाच्या वाढीसह वाढीसह 22,493.55 अंकांवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HG Infra Share Price NSE Live 11 March 2024.

हॅशटॅग्स

HG Infra Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x