14 December 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

BEL Share Price | डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - Marathi News

BEL Share Price

BEL Share Price | डिफेन्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अँटीक स्टॉक ब्रोकींग फर्मच्या तज्ञांनी (NSE: BEL) काही शेअर्स निवडले आहेत. यामध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स, भारत डायनॅमिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि माझगाव डॉक यासारखे दिग्गज शेअर्स सामील आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)

नुकताच भारत सरकारने सशस्त्र दल आणि तटरक्षक दलाच्या ऑपरेशनल क्षमतांमध्ये सुधारणा करण्यासाठी एकूण 1.4 ट्रिलियन रुपये मूल्याचे संरक्षण साहित्य अधिग्रहण करण्यास मंजूरी दिली आहे. याचा फायदा भारतीय डिफेन्स कंपन्यांना होऊ शकतो.

याच संधीचा फायदा गुंतवणुकदारांना घेता यावा यासाठी तज्ञांनी काही शेअर्सची टार्गेट प्राइस अपडेट केली आहे. यामध्ये BEL, Mazagon, GRSE आणि इतर डिफेन्स स्टॉक सामील आहेत. तज्ञांच्या मते, HAL स्टॉक पुढील काळात 6,145 रुपये किमतीवर जाऊ शकतो. BEL स्टॉक 381 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी BEL स्टॉक 1.83 टक्के घसरणीसह 278.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तसेच BDL स्टॉक 1,579 रुपये किमतीवर जाऊ शकतो. माझगाव डॉक कंपनीचे शेअर्स पुढील काळात 5,486 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तर GRSE स्टॉक 2,092 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या सर्व स्टॉकवर तज्ञांनी BUY रेटिंग जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, या डिफेन्स खरेदी प्रस्तावात खालील साहित्य आहेत.
* फ्युचर-रेडी कॉम्बॅट व्हेइकल्स : भारत फोर्ज, महिंद्रा डिफेन्स, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स
* एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार : BEL
* फॉरवर्ड रिपेअर टीम (ट्रॅक केलेले) : आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेड
* डॉर्नियर-228 विमान : एचएएल
* नेक्स्ट जनरेशन फास्ट पेट्रोल व्हेसल्स : एमडीएल, जीआरएसई, कोचीन शिपयार्ड
* नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स : एमडीएल, जीआरएसई, कोचीन शिपयार्ड

भारताचे संरक्षण बजेट 74.7 अब्ज डॉलर्स असून 2024 मध्ये भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा सशस्त्र देश बनला आहे. अंतरिम बजेट 2024-25 मध्ये डीप टेकसाठी भारत सरकारने 12.0 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1 लाख कोटी रुपये राखून ठेवले आहेत. या रकमेतून भारतीय कंपन्यांना दीर्घकालीन कर्ज वाटप केले जातील. यापैकी 2.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच 23,855 कोटी रुपये DRDO ला दिले जातील.

भारतीय लष्करी व्यवहार विभाग आणि संरक्षण मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा भाग म्हणून, संरक्षण क्षेत्रासाठी स्वदेशी वस्तू वापरण्याचे निश्चित केले आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर बनवल्या जाणाऱ्या 509 उत्पादनांसह पाच स्वदेशी वस्तूंच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 2022 पासून भारत जगात संरक्षण खर्चाच्या बाबतीत देखील चौथ्या क्रमांकावर आहे.

2028-2029 पर्यंत भारत सरकारने वार्षिक 6.02 अब्ज डॉलर्स म्हणजेच 50,000 कोटी रुपये मूल्याच्या संरक्षण उत्पादनांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-2023 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास निधीपैकी 25 टक्के रक्कम स्टार्टअप्स आणि खाजगी क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ग्लोबल पॉवर इंडेक्सनुसार 0.0979 च्या स्कोअरसह भारतीय संरक्षण क्षेत्र शस्त्रास्त्रांच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. 2025 पर्यंत भारत सरकारने 25 अब्ज डॉलर्सची संरक्षण उपकरणे बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

Latest Marathi News | BEL Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x