 
						BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच बीईएल या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 0.70 रुपये म्हणजेच दर्शनी मूल्याच्या 70 टक्के दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 23 मार्च हा दिवस निश्चित केला आहे. मजबूत ऑर्डर प्रवाहामुळे भारतातील दोन ब्रोकरेज फर्मने बीईएल स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 189.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 188.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 216.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 89.68 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 105.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 110.58 टक्के वाढले आहे.
स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगनुसार, बीईएल कंपनीने 15 मार्च 2024 रोजी आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2023-24 साठी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर 70 टक्के म्हणजेच 70 पैसे प्रति शेअर इतका दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हा दुसरा अंतरिम लाभांश घोषणेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केला जाईल. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 23 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना पहिला अंतरिम लाभांश प्रति शेअर 0.70 रुपये म्हणेजच दर्शनी मूल्याच्या 70 टक्के एवढा लाभांश वाटप केला होता. सध्याच्या किमतीनुसार बीईएल कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 0.95 टक्के आहे. बीईएल कंपनीने ऑगस्ट 2001 पासून आतापर्यंत जवळपास 50 वेळा लाभांश वाटप केले आहे. दरम्यान कंपनीने शेअरधारकांना 3 वेळा बोनस देखील दिले वाटप केले होते. आणि एक-वेळ स्टॉक स्प्लिट देखील केले होते.
16 मार्च 2017 रोजी बीईएल कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या शेअर्समध्ये विभाजित केले होते. 2015 पासून आतापर्यंत या कंपनीने गुंतवणुकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. पहिल्यांदा कंपनीने 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते.
त्यांनतर 2017 आणि 2022 मध्ये कंपनीने अनुक्रमे 1:10 आणि 2:1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने बीईएल स्टॉकवर 218 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना अल्पावधीत 15 टक्के नफा सहज मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		