9 May 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tax Saving Mutual Funds | पगारदारांनो! वर्षानुवर्षे पैशांचा वर्षाव करणाऱ्या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 12 रुपये! तज्ज्ञांचा स्टॉक 'होल्ड' करण्याचा सल्ला, पुढे 100% परतावा देईल Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे 5 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर स्वस्तात खरेदी करा, यापूर्वी 350% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत झाली Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित या 2 शेअर्सवर मजबूत ब्रेकआउट, मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 132 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका
x

Reliance Power Share Price | 26 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअर्सची खरेदी वाढली, कंपनीकडून सकारात्मक अपडेट वाढल्या

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि डीबीएस बँकेचे कर्ज पूर्णपणे निकाली काढले आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 26.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स पॉवर कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त कंपनी होण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. सध्या रिलायन्स पॉवर कंपनीवर फक्त आयडीबीआय बँकेचे कर्ज शिल्लक राहिले आहे. मागील 4 वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2115 टक्के परतावा कमावून दिला आहे.

27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 25.02 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील एका वर्षभरात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 145 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 10.24 रुपयेवरून वाढून 25 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये आहे.

रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 263.10 रुपये किमतीवर पोहोचले होते. हा कंपनीचे शेअर्स 264 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या जवळ पोहचले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीची प्रवर्तक कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची 2100 कोटी रुपये मूल्याचे थकबाकी असलेले कर्ज परतफेड करण्याची योजना आखली आहे. मागील एका वर्षात रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये 80 टक्क्यांची घसरण झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 22 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x