Reliance Infra Share Price | 1 महिन्यात 42% परतावा देणाऱ्या शेअर चार्टवर सुसाट तेजीचे संकेत? तज्ज्ञ काय म्हणाले?

Reliance Infra Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात आले आहेत. अनिल अंबानी गृपचा भाग असलेल्या कंपन्या मागील काही दिवसांपासून कर्ज परतफेडीच्या बातम्यांमुळे चर्चेत आले आहेत. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.93 टक्के घसरणीसह 292.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स इन्फ्रा कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीने जेसी फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कर्जाची परतफेड केली आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 9 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 28 टक्के वाढवले आहेत.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने 17 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअरने देखील मजबूत वाढ नोंदवली आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या अखेरीस कर्जमुक्त होण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने नुकताच JSW रिन्युएबल एनर्जी कंपनीसोबत 132 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. ही कंपनी महाराष्ट्रातील आपला 45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प JSW रिन्युएबल एनर्जी कंपनीला विकणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 05 April 2024.