3 May 2025 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा सेना किंवा भाजपातून राजकारणात?

Police Officer Pradip Sharma, Police officer Pradeep Sharma, Shivsena, BJP, State Assembly Election 2019

मुंबई : पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट मानले जाणारे आणि खंडणी विरोधात कारवाई करून गुंडांची पळताभुई करणारे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजकारणात सक्रिय होण्यासाठी प्रदीप शर्मा यांनी आपल्या शासकीय सेवेचा मुदतपूर्व राजीनामा दिला आहे.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षाकडून त्यांना मुंबईच्या अंधेरी पूर्व मतदारसंघातून किंवा नालासोपारा या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रदीप शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी चांगलीच जवळीक वाढवली आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत युतीकडूनच प्रदीप शर्माची उमेदवारी निश्चित असल्याचं दिसत आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान शर्मा यांनी आपल्या शासकीय सेवेत अनेक महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी आपला बहुतांश काळ हा मुंबईतील गुन्हे शाखा आणि विशेष दलात घालवला आहे. गुन्हे शाखेत असताना शर्मा यांनी तब्बल ११३ गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. तसेच मागील २ वर्षापासून ठाणे येथे खंडणी विरोधी पथकात कार्यरत होते. मात्र विधानसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा असल्याने प्रदीप शर्मा यांनी आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षात निवडून येणाऱ्या आणि समाजातील विविध घटकांशी जोडल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांचा शोध सुरु आहे. दरम्यान मुंबई पोलीस दलातील धडाकेबाज अधिकारी प्रदीप शर्मा यांना स्वतःच्या पक्षात ओढण्यासाठी जवळपास सर्वच पक्षात जोरदार स्पर्धा लागण्याची शक्यता होतीहे. विशेष म्हणजे पोलीस दलात कार्यरत असले तरी प्रदीप शर्मा यांच्या पी. एस. फाउंडेशनने मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात मोठी समाज कार्य केली आहेत. अंधेरी पूर्वेतील गरजूंसाठी स्वस्त धान्य भंडार, शैक्षणिक मदत आणि स्वास्थ संबंधित मदत करून प्रदीप शर्मा यांची पी. एस. फाउंडेशन सामान्यांच्या परिचयाची झाली आहे.

दरम्यान, पी. एस. फाउंडेशन अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात सर्व धर्मियांसोबत जोडली गेल्याने, या मतदासंघात प्रदीप शर्मा यांचा समाज कार्याच्या आवाका देखील वाढला आहे. विशेष म्हणजे पी एस फाउंडेशनसोबत अंधेरी पूर्वेतील सर्वच पक्षातील पदाधिकारी सभासद म्हणून जोडले गेल्याने, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्या सारख्या समाजकार्यातून सामान्यांशी जोडल्या गेलेल्या आणि डॅशिंग अधिकारी म्हणून सर्वश्रुत असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी अनेकांनी जोरदार प्रयत्नं सूर केले होते. प्रदीप शर्मा यांना स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी भाजप देखील आग्रही होता आणि स्वतः प्रदीप शर्मा यांचे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे समाज कार्य आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले प्रदीप शर्मा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्की कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे. मात्र त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या बातमीने अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील इच्छुक असलेले शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके, माजी नगरसेवक कमलेश राय आणि भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांचे धाबे दणाणले आहेत असं वृत्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या