18 May 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ
x

Patel Engineering Share Price | दिग्गज गुंतवणुकदारांनी खरेदी केला हा स्वस्त शेअर, स्टॉक पुढे मोठी कमाई करून देणार

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांनी देखील गुंतवणूक केली आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स पुढील काळात वाढू शकतात. ( पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 56-58 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही दिवसात 66 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी पटेल इंजिनीअरिंग स्टॉक 7.46 टक्के वाढीसह 63.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी पटेल इंजिनीअरिंग स्टॉक खरेदी करताना 53 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 79 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. मागील वर्षी एप्रिल 2023 महिन्यात या कंपनीचे शेअर 17.11 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मार्च 2024 मध्ये पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 39.41 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 55.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्या केडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे 1,20,00,000 शेअर्स म्हणजेच 1.55 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

बँक ऑफ बडोदाने पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे 1.02,25,000 शेअर्स म्हणजेच 1.32 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीने भारतात 11,000 मेगावॅट क्षमतेचे 40 जलविद्युत प्रकल्प पूर्ण केले आहेत. पटेल इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या भारतातील निर्माणाधीन 18,000 MW क्षमतेच्या प्रकल्पांपैकी 8,000 MW क्षमतेच्या प्रकल्पाचे सुरू केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 22 April 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x