25 May 2024 4:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | शेअर प्राईस 52 रुपये! झटपट मिळेल 23 टक्केपर्यंत परतावा, कमाईची संधी सोडू नका Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 25 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु
x

Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या शेअर्समध्ये मजबूत तेजीत पाहायला मिळत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

व्होडाफोन आयडिया कंपनीचा 18 हजार कोटी रुपये मूल्याचा एफपीओ तीन दिवसांत 6.99 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स 14.43 टक्क्यांच्या वाढीसह 14.75 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 3.44 टक्के वाढीसह 13.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्होडाफोन आयडिया कंपनीचा 18 हजार कोटी रुपये मूल्याचा एफपीओ भारतातील सर्वात मोठा एफपीओ ठरला आहे. 18 हजार कोटी रुपये मूल्याच्या FPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 19.31 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 4.54 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या FPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव वाटा 1.01 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. व्होडाफोन आयडिया कंपनीने या FPO अंतर्गत 11 रुपये किमतीवर शेअर्स वाटप केले आहेत.

FPO च्या माध्यमातून जारी करण्यात आलेले शेअर्स 25 एप्रिल रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या एफपीओच्या यशामुळे कंपनीचा विविध बँकांमधून 25 हजार कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा मार्ग सोपा होणार आहे. याशिवाय कंपनीची 4G आणि 5G बाबतही स्थिती देखील मजबूत होईल. कंपनीला आपले ग्राहक परत मिळण्यास मदत होईल आणि FPO मधून उभारलेले 5720 कोटी रुपये 5G सेवा सुरू करण्यासाठी खर्च केले जातील.

नुकताच IIFL फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉकची टारगेट प्राइस 19 रुपये निश्चित केली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने भांडवल उभारणी करून 4G आणि 5G नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचा FPO शेवटच्या दिवशी 6.36 पट सबस्क्रिप्शनसह क्लोज झाला होता.

FPO च्या माध्यमातून व्होडाफोन आयडिया कंपनीने आपले 1,260 कोटी शेअर्स विक्रीसाठी जारी केले होते. या कंपनीला FPO च्या माध्यमातून 18,000 कोटी रुपये भांडवल मिळाले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने 45,000 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना आखली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 25 April 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x