
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात येस बँक स्टॉक 3 टक्क्यांनी घसरला होता. तर दिवसाअखेर शेअर किंचित सावरला. मागील काही दिवसापासून कार्लाइल ग्रुप येस बँकेतील आपले भाग भांडवल कमी करणार आहे, अशा बातम्या मिळत आहे. ( येस बँक अंश )
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्लाइल ग्रुप येस बँकेचे 2 टक्के भाग भांडवल विकू शकते. कार्लाइल ग्रुपने या व्यवहारासाठी बँकर म्हणून गोल्डमन सॅक्सला नियुक्त केल्याची बातमी मिळत आहे. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.96 टक्के घसरणीसह 24.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कार्लाइल ग्रुप येस बँकेचे शेअर्स 25 रुपये प्रति शेअर या किमतीवर विकू शकतो. शुक्रवारी येस बँकेचे शेअर्स 24.85 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर येस बँकेने 25.82 रुपये इंट्रा-डे उच्चांक स्पर्श केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा स्टॉक घसरला.
कार्लाइल ग्रुपने सीए बास्क इन्व्हेस्टमेंट्स कंपनीच्या माध्यमातून येस बँकेत मोठी गुंतवणूक केली आहे. येस बँकेत सीए बास्क इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने 8.74 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. यापूर्वी कार्लाइल ग्रुपने येस बँकेचे 1057 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकले होते.
मॉरिशस स्थित या कंपनीकडे येस बँकेचे 39 कोटी शेअर्स आहेत. त्यांनी हे शेअर्स 27.10 रुपये किमतीवर खरेदी केले होते. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेने 452 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 123 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. येस बँकेने जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान 7447.17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.