
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 10 टक्क्यांनी वाढला आहे. 13 मे रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 222 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक 245 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक 8.95 टक्के वाढीसह 259.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
मागील पाच वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 245.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 105 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.79 लाख कोटी रुपये आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 68 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीचे शेअर्स 126 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 17 मे 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 30 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर या किमतीवरून हा स्टॉक 699 टक्के वाढला आहे.
1 जानेवारी 1999 रोजी या कंपनीचे शेअर्स 22 पैशांवर ट्रेड करत होते. या किमतीवर पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी तब्बल 111218 टक्के नफा कमावला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 300 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना पुढील काळात 20 टक्क्यांहून अधिक नफा कमावून देऊ शकतो. तज्ञांच्या मते, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या किमतीत आणि स्टॉक व्हॉल्यूममध्ये झालेली वाढ गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहे. काही दिग्गज तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 320 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.