6 May 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार?
x

कसबा विधानसभेसाठी चंद्रकांत पाटील आग्रही? वेटिंगलिस्ट'वरील नेते ५ वर्ष वेटिंगवरच?

Kasaba constituency, BJP President and Minister Chandrakant Patil, Minister Chandrakant Patil, Maharashtra Assembly Election 2019, MNS Rupali Patil, MNS Rupali Patil Thombare

मुंबई : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तस तशी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धडपड सर्वच पक्षातील उमेदवारांकडून होताना दिसते. भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते आणि विद्यमान महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये राजकारण खेळत सध्या अचानकपणे पुण्यातील कसबा विधानसभेच्या जागेवर डोळा ठेऊन असल्याचं वृत्त आहे आणि त्यासाठी त्यांनी अंतर्गत चाचपणी देखील सूर केल्याचे समजते.

मागील काही दिवसांपासून त्यांनी पुण्यावर विशेष लक्ष दिल्याचे पाहायला मिळते. कोल्हापूर आजही त्यांना धोकादायक वाटत असल्याने पुण्यातील सुरक्षित अशा कसबा जागेसाठी त्यांनी पक्षाकडे आग्रह धरल्याचे समजते. दरम्यान माजी कॅबिनेटमंत्री आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार गिरीश बापट यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर कसबा मतदार संघाची जागा रिक्त आहे. कसब्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये मोठी चुरस निर्माण झाला होती. मात्र, या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या महापौर मुक्ता टिळक, हेमंत रासने, धीरज घाटे आणि गणेश बीडकर हे सर्व नेतेमंडळी पुढील ५ वर्ष वेटिंग लिस्टवर जाण्याची शक्यता आहे.

या मतदार संघातून प्रदेशाध्यक्षांचेच नाव समोर आल्याने इच्छूकांना आपली इच्छा मारावी लागणार आहे. कसबा मतदार संघ अत्यंत सुरक्षित मतदार संघ मानला जातो. गिरीश बापट यांनी या मतदार संघावर पंचवीस वर्षे एकछत्री अमंल राखले. सलग ५ वेळा गिरीश बापट या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती.

दरम्यान चंद्रकांत पाटील सध्या पुण्याचे पालकमंत्री आहेत. विधानसभेला त्यांनी पुण्यातून प्रतिनिधीत्व केल्यास भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर ते पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात. कसबा मतदार संघ जरी बापट यांनी अभेद्य ठेवला असला तरी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा गड मानला जायचा. त्यामुळे पुण्यातील वर्चस्वासाठी भारतीय जनता पक्ष आणि एनसीपी’मध्ये पुन्हा चुरस लागणार हे निश्चित. याच मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रुपाली पाटील ठोंबरे या इच्छुक असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x