2 May 2024 6:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज मोहम्मद आमीर निवृत्त

Pakistan, Pakistani Cricket Team, fast bowler Mohammad Sami

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट टीमचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याने वयाच्या अगदी २७व्या वर्षी आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. हि घोषणा त्यांनी शुक्रवार २६ जुलै २०१९ रोजी केली. २००९ मध्ये श्रीलंके समोर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मोहम्मद आमीर यांचं वय १७ वर्षे होतं.

पाकिस्तान साठी ३६ कसोटी सामने खेळून आमीर यांनी ११९ विकेट घेतल्या व त्यांची गोलंदाजी ची सरासरी ३७.४० आहे. २०११ मध्ये इंग्लंड येथे घडलेल्या स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी मोहम्मद आमीर ला ३ महिने तुरुंगवास व ५ वर्षांच्या बंदीला सामोरी जावं लागलं. आमीर ने जानेवारी २०१६ मध्ये पाकिस्तान टीम मध्ये पुन्हा पदार्पण केले व नंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या अप्रतिम गोलंदाजी ने आपल्या टीम ला २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यास सहकार्य केले. आमीर ने आपल्या खेळाच्या कालावधीत ४ वेळा ५-बळींचा विक्रम केला आहे आणि त्याची सर्वोत्तम गोलंदाजी मध्ये त्याने २०१७ मध्ये किंगस्टन येथे वेस्ट-इंडिज समोर ४४ रन्स देऊन ६ विकेट काढल्या होत्या.

जानेवारी २०१९ मध्ये साऊथ आफ्रिका समोर आमीर याने पाकिस्तान साठी आपला शेवटचा कसोटी सामना खेळला व ह्या सामन्यात त्याने ४ विकेट काढल्या. “पाकिस्तान साठी कसोटी क्रिकेट खेळणं हे अतिशय सन्मानास्पद होते आणि मी आता पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटकडे माझं लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे आमीर’ने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x