
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी येत आहे. जुलै-सप्टेंबरच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
वृत्तानुसार, केंद्र सरकार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुढील महागाई भत्ता जाहीर करू शकते, जी किमान 3 टक्के असण्याची शक्यता आहे. एआयसीपीआय निर्देशांकात 1.5 अंकांची मोठी वाढ झाली आहे. यामुळे महागाई भत्त्याच्या स्कोअरमध्येही वाढ झाली आहे.
कामगार मंत्रालयाची शाखा असलेल्या लेबर ब्युरोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (CPI-IW) केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढल्यास एचआरएसह कर्मचाऱ्यांच्या पगारातील इतर काही घटकांमध्येही वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो, तर पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DR) दिला जातो.
महागाई भत्ता वाढल्यानंतर पगार किती वाढणार?
बेसिक सॅलरीमध्ये ग्रेड सॅलरी जोडल्यानंतर निर्माण होणाऱ्या पगारात महागाई भत्त्याचा दर गुणाकार केला जातो. जो परिणाम येतो त्याला महागाई भत्ता (डीए) म्हणतात. म्हणजेच, (बेसिक पे + ग्रेड पे) × डीए % = डीए रक्कम
50 हजारांच्या बेसिक सॅलरीवर
समजा बेसिक सॅलरी 50 हजार रुपये आहे. 50 हजाररुपयांपैकी 53% काढल्यानंतर ते 26500 रुपये झाले. या सर्वांची भर 76,500 रुपये झाली. म्हणजेच आता पगार वाढून 76500 रुपये होणार आहे. तर सध्या 50 टक्के डीएनुसार 75000 रुपये मिळत आहेत. या अर्थाने त्यात 16500 रुपयांची (76500-75000 = 1650) वाढ होईल.
25 हजारांच्या बेसिक पगारावर : समजा बेसिक सॅलरी 25 हजार रुपये आहे. 25,000 रुपयांपैकी 53% काढल्यानंतर ते 13250 रुपये झाले. या सर्वांची भर 38,250 रुपये झाली. तर 25000 रुपये बेसिक वर 50 टक्के डीएनुसार एकूण पगार 37,500 रुपये आहे. म्हणजेच डीएमध्ये 3 टक्के वाढ केल्यास 7500 रुपयांचा (38,250-375000 = 750) फायदा होईल.
3 टक्के डीआर वाढीचा पेन्शनधारकांना किती फायदा?
केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये महागाई मदत (डीआर) मध्ये अंदाजे 3% वाढीसह वाढ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याप्रमाणेच डीआर हादेखील पेन्शनचा एक घटक आहे, ज्याचा उद्देश महागाईपासून दिलासा देणे आहे.
सध्या जर एखाद्याची बेसिक पेन्शन 45000 रुपये असेल तर 50% डीआरसह त्याला 22,500 रुपये महागाई सवलत मिळते. यात 3 टक्क्यांची वाढ होऊन ती 23,850 रुपये होईल. म्हणजेच पेन्शनमध्ये दरमहा 1350 रुपयांची वाढ होणार आहे.