12 May 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील
x

Tata Power Share Price | ग्रेट न्यूज! टाटा मोटर्सचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 248.40 रुपये पातळीवर पोहोचली होती. सोमवारच्या तुलनेत टाटा पॉवर स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता.

24 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉकने 252.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.38 टक्के वाढीसह 247.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या Tata Power Renewable Energy Limited कंपनीने ग्लोबल ऑटोमोटिव्ह सिस्टम आणि पार्ट बनवणाऱ्या आनंद ग्रुपसोबत 4.4MW क्षमतेच्या ग्रुप कॅप्टिव्ह पॉवर डिलिव्हरी प्रोजेक्टसाठी व्यापारी करार केला आहे.

या करारानुसार, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कंपनी नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून 10 दशलक्ष युनिट्स स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून टाटा पॉवर कंपनीला वार्षिक 5,500 टन कार्बन उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड, कंपनीच्या सीईओने माहिती दिली की, “आनंद ग्रुपने टाटा पॉवर कंपनीला या नवीन प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतल्याने आम्हाला आनंद होत आहे. टाटा पॉवर कंपनीचा हा कॅप्टिव्ह प्रोजेक्ट ऑटोमोटिव्ह ऊर्जा निर्मिती उद्योगाला अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी हातभार लावेल. आणि आपले पर्यावरण पूरक वचनबद्धतेचे लक्ष प्राप्त करण्यास मदत करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Power Share Price today on 30 August 2023

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x