29 April 2024 6:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

VIDEO : पाक लष्कराचं विमान नागरी वस्तीत कोसळलं; १७ जणांचा मृत्यू

Ravalpindi Army Plane Crash, Pakistan Army Air Crash, Air Crash

रावलपिंडी : पाकिस्तानच्या रावलपिंडी शहरात मंगळवारी सकाळी पाकिस्तानी लष्कराचं एक विमान नागरी वस्तीत कोसळलं. या अपघातात आतापर्यंत १७ जण ठार झाल्याची माहिती आहे तर १२ जण गंभीररित्या जखमी आहेत. मृतांपैकी ५ जण पाकिस्तानी सैन्यातील जवान आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानी लष्कराकडून दिलेल्या माहितीनुसार या विमान अपघातात २ पायलट मृत्यू झालेत. ही दुर्घटना पाहता रावलपिंडीमधील हॉस्पिटलमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. अपघातात १२ जण जखमी आहे त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. रावळपिंडीजवळच्या मोरा कालू गावात आज पहाटे हे विमान कोसळले. पाकिस्तानी सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार, अपघातात विमानाचे दोन्ही पायलट मरण पावले आहेत. या घटनेनंतर रावळपिंडीतील रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळं झाला याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

वृत्तवाहिन्यांवरील दृश्यांनुसार, विमान कोसळल्यानंतर रहिवासी भागात आग लागली. यामध्ये अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत. बचाव पथकाच्या माहितीनुसार, या विमानाने अचानक आपले नियंत्रण गमावले आणि ते दुर्घटनाग्रस्त झाले. रात्रीची वेळ असल्याने बचाव मोहिम राबवताना अडचणी येत होत्या.

हॅशटॅग्स

#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x