29 April 2024 1:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

अमित ठाकरेंचा पाठपुरावा कामी; गर्भवती महिलांना दिव्यांग प्रवाशांच्या डब्यातून प्रवासाची मुभा आणि...

Amit Thackeray, MNS, Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray, Mumbai Life Line, Mumbai Western Railway, Mumbai Central Railway, Mumbai Harbor Railway

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. तसेच अमित ठाकरे व त्यांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात ३२ सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. या सूचनांपैकी काहींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे. त्यांपैकी कोणत्या सूचनांवर कारवाई केली जाईल वा करण्यात आली आहे याबाबतची माहिती अमित ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

  1. गर्भवती महिलांना दिव्यांग प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करू देण्याची मुभा द्यावी, ही मागणी प्रशासनाने मान्य केली आहे.
  2. महिला प्रवाशांच्या डब्यात फेरीवाल्यांची घुसखोरीला आळा घालता यावा, यासाठी रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
  3. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि रेल्वे पोलीस यांच्यात समन्वय असावा, या मागणीवर तात्काळ संबंधित पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार सुरू झाला आहे.
  4. स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी महापालिकांशी समन्वय वाढावा अशी मागणी होती. यावर हालचाल होऊन महापालिका आणि रेल्वे यांच्यात संवाद सुरू झाल्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
  5. यासह कल्याण, डोंबिवली, खडवली, ठाकुर्ली आणि इतर अनेक रेल्वे स्थानकातील गैरसोयींकडे आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये अस्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून ते विशेष ट्रेन सुरू करण्यापर्यंत अनेक मुद्दे आहेत.

आदी काही सूचनांबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे. तर लवकरच त्या पूर्ण होतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. आश्वासनांची पूर्तता होईपर्यंत याचा पाठपुरावा होईलच, असे त्यांनी म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x