29 March 2024 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

अच्छे दिन येतील तेव्हा येतील 'निदान बरे दिन होते ते तरी आणा' - शिवसेना

Shivsena, Saamana Newspaper, Modi Government

मुंबई: महागाईच्या मुद्द्यावरून अग्रलेखात भारतीय जनता पक्षाच्या ‘अच्छे दिन’ या संकल्पनेची खिल्लीही उडवण्यात आली आहे. अच्छे दिन येतील तेव्हा येतील, पण महागाई आटोक्यात आणून निदान जे काही बरे दिन होते ते तरी सामान्य माणसाच्या जीवनात आणा, असा टीका वजा सल्ला अग्रलेखाद्वारे देण्यात आला आहे. ‘महंगाई डायन मारी जात हैं’ असा प्रचार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत करून ज्यांनी सत्ता प्राप्त केली त्यांच्या राजवटीत तीच महंगाई डायन पुन्हा सामान्य जनतेच्या मानगुटीवर बसली आहे, असे म्हणत जे लोक या परिस्थितीविरुद्ध बोलतात त्यांना देशविरोधी ठरवायचे काम भक्त मंडळी आहेत, अशा शब्दात शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे.

“तुमचा तो नागरिकता सुधारणा कायदा, एनआरसी वगैरे गोष्टी, त्यावरून उठलेले वादंग सुरूच राहील, पण सामान्य माणसाला सोसाव्या लागणाऱया महागाईच्या झळांचे काय? सीएए, एनआरसीमुळे सामान्य माणसाच्या पदरात ना नोकरी पडणार आहे ना पगार, ना भाजीपाला-अन्नधान्य स्वस्त होणार आहे ना इतर जीवनोपयोगी वस्तू. जनतेवर आलेली महागाईची ‘संक्रांत’ आपल्यावरच उलटू शकते, याचे भान केंद्रातील सत्ताधाऱयांनी ठेवलेले बरे!,” असा इशारा देणारा बाण शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर सोडला आहे.

एकीकडे नवीन रोजगारनिर्मिती नाही, आहे त्या नोकरीवरही टांगती तलवार आणि दुसरीकडे महागाईच्या वणव्याच्या वाढत्या झळा. देशातील सामान्य जनता या झळांनी होरपळते आहे. इतर कामांचे ढोल पिटण्यापेक्षा सरकारने या झळा कमी कशा होतील याकडे लक्ष द्यायला हवे. ते नाही दिले तर जनतेवर आलेली महागाईची ‘संक्रांत’ आपल्यावरच उलटू शकते, याचे भान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी ठेवलेले बरे, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

 

Web Title:  Shivsena mouthpiece Saamana Newspaper political attacked on Modi government.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x