1 May 2025 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, ट्रेनमध्ये अशी मिळवता येईल लोअर बर्थ सीट, बुकिंगबद्दल लक्षात घ्या या गोष्टी - Marathi News

Highlights:

  • Railway Ticket Booking
  • भारतीय रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना या सुविधा दिल्या जातात :
  • पुढे दिलेले नियम लक्षात ठेवा
  • ग्रुपमधून प्रवास करत असाल तर, ही गोष्ट लक्षात ठेवा :
  • सीनियर सिटीजन कोटाचा वापर करा :
  • तिकीट बुकिंगची वेळ महत्त्वाची :
  • तिकीट बुकिंगवेळी योग्य वय टाका :
Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | भारतीय रेल्वेकडून जेष्टांसाठी लोअर बर्थची सीट मिळवण्याकरिता काही नियम सांगितले गेले आहे. यामध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांना अगदी सहजरित्या रेल्वेचा प्रवास करता येणार आहे. भारतीय रेल्वेकडून कोणकोणते नियम दिले गेले आहेत हे आज आपण पाहणार आहोत. त्याआधी ही गोष्ट लक्षात ठेवा की, लोअर बर्थचे आरक्षण हे तेव्हाच मिळेल जेव्हा एक ज्येष्ठ नागरिक किंवा एका सोबत दुसरा व्यक्ती प्रवास करत असेल.

परंतु तुम्ही ग्रुपने म्हणजे दोनपेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करत असाल तर, तुम्हाला या आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. त्याचबरोबर समजा एखाद्या बुद्ध व्यक्तिला मधला किंवा वरचा बर्थ मिळाला असेल तर, तिकीट तपासणी करणारे कर्मचारी त्या वृद्ध व्यक्तीला लोअर बर्थवर ट्रान्सफर करू शकतात. चला तर पाहूया सर्व नियम.

भारतीय रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना या सुविधा दिल्या जातात :

भारतीय रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी अनेक सुविधा प्रदान केल्या जातात. महत्त्वाचं म्हणजे तिकीटांवर सवलती आणि लोअर बर्थ बुकिंगसाठी आरक्षण दिले जाते. योग्य नियमांचं पालन केल्यानंतर कोणतीही गैरसोय न होता ज्येष्ठ नागरिक अगदी आरामात प्रवास करू शकतो. वृद्ध व्यक्तींना मधल्या आणि वरच्या बर्थमध्ये चढणे समस्याचे कारण बनू शकते यासाठी केवळ जेष्ठांना भारतीय रेल्वेकडून सीनियर सिटीजन कोटा अंतर्गत लोअर बर्थसाठी आरक्षण दिले जाते. जेणेकरून प्रवासांचे हाल होता कामा नये.

पुढे दिलेले नियम लक्षात ठेवा

1) ग्रुपमधून प्रवास करत असाल तर, ही गोष्ट लक्षात ठेवा :
बऱ्याचदा वृद्ध व्यक्ती एकटे प्रवास करण्यात घाबरतात. त्याचबरोबर तुम्ही ग्रुपने प्रवास करत असाल तर तुमच्या वृद्ध आई किंवा वडिलांचं तिकीट सेपरेट काढा. तुमच्याबरोबर तिकीट काढून चूक करू नका. कारण की, वृद्ध आई-वडिलांचं सेपरेट तिकीट काढल्यामुळे त्यांना लोअर बर्थ मिळण्याची शक्यता असते.

2) सीनियर सिटीजन कोटाचा वापर करा :
तुमच्या वृद्ध आई-वडिलांचे किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीचे तिकीट काढत असाल तर, त्यांचा कोटा चेक करा. सिनिअर सिटीजन कोट्याचा वापर करूनच तिकीट बुक करा. यासाठी तुम्ही IRCTC वेबसाईटचा पर्याय निवडून ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक करू शकता. कारण की सीनियर सिटीजन कोट्याअंतर्गत ज्येष्ठांना लवकरात लवकर लोअर बर्थ मिळण्याची शक्यता असते.

3) तिकीट बुकिंगची वेळ महत्त्वाची :
बऱ्याचदा सणासुदींच्या काळात ट्रेनला प्रचंड गर्दी असते. अनेक प्रवासी गावी किंवा नवीन शहरात जाण्यासाठी ट्रेनचा वापर करतात. अशावेळी तुम्ही लवकरात लवकर तिकीट बुक करून स्वतःची सीट कन्फर्म करू शकता. आरक्षणे उघडल्याबरोबर तुम्ही ज्येष्ठांसाठी आणि स्वतःसाठी तिकीट बुक करून टेन्शन फ्री प्रवास करू शकता.

4) तिकीट बुकिंगवेळी योग्य वय टाका :
ज्येष्ठांना लोअर बर्थ मिळवून द्यायचे असेल तर, तिकीट बुकिंगवेळी त्यांचा योग्य वय मेन्शन करा. समजा तुम्ही योग्य वय टाकलं नाही तर, ज्येष्ठांना लोअर बर्थ सीट मिळणे मुश्किल होईल. एवढंच नाही तर, स्लीपर क्लास आणि एसी क्लासमध्ये प्रचंड फरक असतो. स्लीपरमध्ये लोअर बर्थची संख्या जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जिथे तुम्हाला जास्त लोअर बर्थ सीट उपलब्ध होतील तिथच तुमची सीट कन्फर्म करा.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 01 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या